नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नांदेड| राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विरोध करण्यासाठी रविवारी नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील विविध समाजबांधवांचा मोठा जनसमुदाय या महामोर्चात सहभागी झाला.
महात्मा फुले पुतळा येथून महामोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजातील ५९ अनुसूचित जातींवर त्याचा परिणाम होईल, असा दावा आंदोलकांनी केला. राज्य सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आरक्षणाच्या प्रश्नावर अनुसूचित जातीतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला विरोध सरकारपर्यंत पोहोचवला. महामोर्चा जिल्हाधि...
