आयडीबीआय बँकेकडून कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची मागणी
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचा संताप; पात्र लाभार्थ्यांना तातडीने नवीन पीककर्ज देण्याची मागणी
शहापूर, देगलूर, गंगाधर मठवाले | सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, तसेच कर्जमाफीनंतर नवीन पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी आयडीबीआय बँक व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच इतर काही बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून काहींच्या खात्यावर कर्जाची रक्कमही जमा ...
