Tag: आमली बारशी

खडकी बा. येथील जागृत रोकडोबा मारोती मंदिर, परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम

खडकी बा. येथील जागृत रोकडोबा मारोती मंदिर, परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (अनिल मादसवार ) तालुक्यातील मौजे खडकी (बा.) येथील जागृत देवस्थान रोकडोबा मारोती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. बाल अवतारातील दक्षिणमुखी हनुमानाची ही मूर्ती पुरातन काळापासून येथे विराजमान असून, तिच्याशी निगडित एक विशेष आख्यायिका स्थानिकांमध्ये प्रचलित आहे. माहितीनुसार, ही मूर्ती बैलगाडीतून सिरंजणी येथे नेण्यात येत असताना खडकी येथे मुक्कामासाठी थांबलेला ताफा दुसऱ्या दिवशी पुढे निघाला, मात्र मूर्ती असलेली बैलगाडी हललीच नाही. यानंतर खडकी व सिरंजणी गावातील नागरिकांनी ही दैवी इच्छा मानून येथेच मूर्तीची स्थापना केली. त्या दिवसापासून या मंदिराला “रोकडोबा मारोती” म्हणून ओळख मिळाली. दरवर्षी आमली बारशीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवा ध्वज फडकवून व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने पूजा केली जाते. गुढीपाडव्यापासून आमली बारशीपर्यंत श...
error: Content is protected !!