Tag: आध्यात्मिक ऊर्जा

भक्ती, वेदघोष आणि आध्यात्मिक ऊर्जेचा दिव्य संगम; निकालपूरात प्रथम ब्रह्मोत्सवाची पर्वणी 

भक्ती, वेदघोष आणि आध्यात्मिक ऊर्जेचा दिव्य संगम; निकालपूरात प्रथम ब्रह्मोत्सवाची पर्वणी 

तेलंगणा, धर्म अध्यात्म
नंदीपेठ/निकालपूर, सादुल्ला नविनकुमार| ग्राम निकालपूर, मंडल डोणकेश्वर, जिल्हा निझामाबाद येथे श्री लक्ष्मी वेंकटेश्वर स्वामी यांच्या प्रथम वार्षिक ब्रह्मोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात दोन दिवसीय भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गाव सध्या भगव्या पताका, विद्युत रोषणाई आणि वेदघोषांनी दुमदुमून गेले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा दिव्य ब्रह्मोत्सव श्री वैष्णव संप्रदायाचे प्रचारक त्रिदंडी श्रीमन्नारायण चिन्न जियर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पल्लीगुट्टाचे मठाधीश्वर श्री बालयोगी रामलू महाराज यांच्या पावन उपस्थितीत संपन्न होणार आहे. शुक्रवार दि. 8 मे व शनिवार दि. 9 मे 2026 रोजी होणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, होम-हवन, विशेष पूजाअर्चा, भजन-कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रथम ब्रह्मोत्सवानिमित्...
error: Content is protected !!