Tag: अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

महाराष्ट्र
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (दि. 12 मे) अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागासह पंचायत समिती, गट विकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, उपकोषागार कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तहसील कार्यालयात त्यांनी महसूल विभागातील विविध कार्यासनांना भेट देत प्रत्येक विभागाच्या जाबचार्टची तपासणी केली. तसेच ‘आरटीएस’ अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे नसल्याची खात्री केली. अभिलेख कक्षालाही भेट देऊन अभिलेखांच्या नक्कल वितरण प्रक्रियेची पाहणी करत कामकाज अधिक सुलभ व प्रभावी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासकीय जमिनींच्या अभिलेख ...
error: Content is protected !!