Tag: अर्ज प्रक्रिया सुरू

पीएच.डी. कोर्सवर्क (Backlog) परीक्षा उन्हाळी–२०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

पीएच.डी. कोर्सवर्क (Backlog) परीक्षा उन्हाळी–२०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पीएच.डी. कोर्सवर्कमध्ये अनुत्तीर्ण (Backlog) राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी–२०२६ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. सदर परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार ऑफलाईन व लेखी (Pen & Paper) स्वरूपात घेण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा अर्ज त्यांच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा संकुलामार्फत सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ₹३१०/- इतके निश्चित करण्यात आले असून अर्ज स्वीकृतीचा कालावधी ४ मे ते ७ मे २०२६ असा आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२६ आहे. तसेच संशोधन केंद्रांनी अर्ज व शुल्कासह कागदपत्रे परीक्षा विभागाकडे ११ मे २०२६ पर्यंत सादर करावीत. शुल्क भरण्यासाठी धनादेश, ...
error: Content is protected !!