नरसीप्रमाणे बिलोलीतही अतिक्रमण हटवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
उपविभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन; प्रशासनाच्या दिरंगाईवर संतप्त सवाल
बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील नरसी (नायगाव) येथे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी कारवाईच्या धर्तीवर बिलोली शहरातील वाढते अतिक्रमणही तातडीने हटविण्यात यावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, बिलोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बिलोलीतील जुने पंचायत समिती कार्यालय, नवीन पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्ता तसेच शहरालगतच्या मालगुजारी (वमन) तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे वाहतूक, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम ...
