Tag: अनोखा उपक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना पुस्तकांचे तोरण; जवळा शाळेचा अनोखा उपक्रम

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना पुस्तकांचे तोरण; जवळा शाळेचा अनोखा उपक्रम

करियर
नांदेड, प्रतिनिधी| जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील जवळा (दे.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरातील झाडांना पुस्तकांचे तोरण बांधून “मुक्त बाल वाचनालय” सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. परीक्षेनंतरच्या कालावधीत दररोज सकाळी दोन तास विद्यार्थी झाडांच्या सावलीत बसून विविध पुस्तके वाचत आहेत. वाचनानंतर विद्यार्थी पुस्तके पुन्हा त्यांच्या जागी ठेवतात. या उपक्रमात गोष्टींची पुस्तके, थोर व्यक्तींची चरित्रे, शूरवीरांच्या कथा तसेच वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळेतील सुमारे दहा झाडांवर अशा पुस्तकांचे तोरण बांधण्यात आले आहे. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संगिता बडवणे, उमाक...
error: Content is protected !!