Tag: अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

माहूरच्या मालवाडा घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; घातपात की अपघात? तपास सुरू

माहूरच्या मालवाडा घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; घातपात की अपघात? तपास सुरू

क्राइम
माहूर, राज ठाकूर| माहूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मालवाडा घाटात रस्त्यालगतच्या उतारावर दोन मोठ्या दगडांच्या मध्ये अडकलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 22 जून) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाडा घाट परिसरात काही नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली. यावेळी उताराच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तात्काळ माहूर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, पोलीस कर्मचारी बाबू जाधव, बिट जमादार सत्यपाल मडावी व ज्ञानेश्वर खदाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असून मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थे...
error: Content is protected !!