Tag: अखिल भारतीय सरपंच परिषद नांदेड

दत्ता कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दत्ता कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा एकंबा गावचे उपसरपंच दत्ता पुंजाराम कोंकेवाड यांची अखिल भारतीय सरपंच परिषद, नांदेड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचे कार्य, लोकसंपर्क कौशल्य आणि ग्रामविकासाबाबतची तळमळ लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय (बापू) जगदाळे यांनी दिनांक ८ जून २०२६ रोजी निवडीचे नियुक्तीपत्र जारी केले. सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकात्मता आणि ग्रामपंचायत व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियुक्तीपत्रानुसार, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामविका...
error: Content is protected !!