गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई; ₹8,300 दंड वसूल
नांदेड| शहरातील गुरुद्वारा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मोठी कारवाई केली. कोटपा (COTPA) 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 21 एप्रिल 2026 रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत एकूण 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करत ₹8,300 दंड वसूल करण्यात आला.
ही मोहीम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध ठिकाणी तपासणी केली.
पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड, एमजीव्हीएसचे मंगेश गायकवा...
