खुनाच्या प्रयत्न प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; १० हजारांचा दंड
हदगाव | हदगाव पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात फिर्यादीने दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी रामदास विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. धानोरा, मु.पो. रूई, ता. हदगाव) याने फिर्यादीस मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२/२०२३ अंतर्गत भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संगिता कदम यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश डॉ. एस. डी. तौशीकर यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभ...
