“सेव आवर सिस्टर” चळवळीला नवे बळ
नांदेड (प्रतिनिधी) जगभरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या तीन प्रमुख अवैध व्यापारांपैकी मानवी तस्करी हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींच्या खरेदी-विक्रीच्या घटनांनी समाजासमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागानेही सक्रिय पावले उचलली असून, स्वतंत्र प्रतिबंधक कक्ष स्थापन करून महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथे वर्षा डहाळे या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मानवी तस्करी प्रतिबंधक कार्याला अधिक गती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर 2002 साली Save the Children India (एसटीसीआय) च्या माध्यमातून “SOS – Save Our Sisters” (आपल्या बहिणींना वाचवा) ही महत्त्वपूर्ण चळवळ सुरू करण्यात आली होती. या चळवळीची सुरुवात विपुला कादरी यांच्या पुढाकारातून झाली. ग्रामीण भागातील महिला व मुलींच...
