क्राइम

सोनारी फाटा येथे पुन्हा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

हिमायतनगरच्या युवकाचा मृत्यू, स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील वार्डक्रमांक 3 मधील रहिवाशी युवक सदाम आपल्या वाहनाने जात असताना सोनारी फाट्यावर अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

सोनारी फाटा हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून, येथे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. विशेषतः स्पीड ब्रेकर नसल्यामुळे किंवा योग्य संकेत चिन्हांच्या अभावामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सोनारी फाटा चौरस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!