क्राइम

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस-महसूलचा संयुक्त ‘धडक’ छापा

90.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत तब्बल 90 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत ही कारवाई राबविण्यात आली.

उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नायगाव तालुक्यातील इज्जतगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, नदीपात्रातून लोखंडी फावड्यांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालात 60 लोखंडी फावडी बोट – अंदाजे किंमत ₹20 लाख 30 हजार, छोट्या लोखंडी इंजिन बोटी – अंदाजे किंमत ₹10 लाख, 4 वाळूचे ढीग (अंदाजे 4 ब्रास) – किंमत ₹20,000 असा एकूण ₹90,20,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!