आरोग्य

20 मार्च ते 20 एप्रिल ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’

जिल्हाभर विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड (गोविंद मुंडकर) दि. 20 मार्च ते 20 एप्रिल 2026 हा कालावधी ‘मौखिक आरोग्य जनजागृती महिना’ म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात येत आहे.नागरिकांमध्ये दंत व मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, नागरिक आणि विशेषतः वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, बालगृहे आणि ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि आरोग्य मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 02 एप्रिल 2026 रोजी नांदेड येथील सुमन बालगृहात मौखिक आरोग्य शिबिर पार पडले.

या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नि. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम बुट्टे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राष्ट्रपाल औसारे तसेच दंतचिकित्सा महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री. राजेश कुमार दार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी तथा दंत शल्य चिकित्सक डॉ. कांतीलाल इंगळे व डॉ. स्नेहल चिंतळे यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार दिले. एकूण 26 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

Oplus_16908288

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना दात स्वच्छ ठेवण्याची योग्य पद्धत, दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याचे महत्त्व, तसेच स्वच्छतेच्या सवयींचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले. दात धुण्याच्या योग्य पद्धतीबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन देण्यात आले.

Oplus_16908288

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दंत महाविद्यालयातील अंतरवासी डॉक्टरांसह श्री. दत्ता जाधव आणि श्री. विशाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मुदखेड, हदगाव आणि देगलूर तालुक्यांतही अशाच प्रकारचे शिबिरे घेण्यात आली असून, नायगाव आणि धर्माबाद या सीमावर्ती भागांतही हे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

Oplus_16908288

जिल्हाभर सुरू असलेल्या या मौखिक आरोग्य जनजागृती मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दंत आरोग्याबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. नियमित तपासणी, योग्य स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास अनेक दंत विकार टाळता येऊ शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. एकूणच, ‘मौखिक आरोग्य महिना’ अंतर्गत राबविण्यात येणारे हे उपक्रम समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!