रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; हलगर्जीपणामुळे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

नांदेड| शहरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेदरम्यान कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याचे आढळल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांतील वादातून जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातच त्याच्यावर पुन्हा हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला. या वेळी सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करत संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top