प्रवाशांसाठी दिलासा! विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेला मुदतवाढ

नांदेड| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, काही विशेष (Train on Demand – TOD) गाड्यांच्या धावण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्या पूर्वीप्रमाणेच विद्यमान थांबे व वेळापत्रकानुसार धावणार आहेत. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुदतवाढ मिळालेल्या विशेष गाड्या:
गाडी क्र. 07605 तिरुपती – अकोला (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07606 अकोला – तिरुपती (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07015 नांदेड – तिरुचेंनुर (शनिवार) : 11 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07016 तिरुचेंनुर – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07189 नांदेड – धर्मावरम (शुक्रवार) : 10 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07190 धर्मावरम – नांदेड (रविवार) : 12 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07609 जालना – तिरुचेंनुर (सोमवार) : 13 एप्रिल 2026 पर्यंत
गाडी क्र. 07610 तिरुचेंनुर – जालना (मंगळवार) : 14 एप्रिल 2026 पर्यंत

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास आगाऊ नियोजित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top