Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeसामाजिककुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

कुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

कुंडलवाडी | कुंडलवाडी शहरातील चुंगी नाका परिसरात क्रिकेट खेळताना घडलेल्या भीषण अपघातात एका 9 वर्षीय मुलगा गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दुपारच्या सुट्टीत अमेरखान सुलतान खान पठाण (वय 9) हा आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना चेंडू जवळच असलेल्या पत्र्याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर जाऊन पडला.

चेंडू आणण्यासाठी मुलगा वर चढला असता, वरून गेलेल्या उच्च दाब विद्युत ताऱ्यांच्या संपर्कात येऊन तो गंभीररीत्या जखमी झाला. विजेच्या धक्क्यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागून तो जळू लागला.

घटनेच्या वेळी परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॉम्प्लेक्सवर चढून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी वर बारदानाची पोती फेकली, त्या सहाय्याने आग विझवण्यात आली.

या घटनेत मुलगा गंभीर भाजला असून त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उघड्यावरून जाणाऱ्या धोकादायक विद्युत तारा, महावितरण विभागाकडून सुरक्षा उपाय- योजनांचा अभाव यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!