Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeराजकारणइनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी...

इनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा!

खा. अशोकराव चव्हाण

नांदेड| नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या थेट घरांशी आणि जमिनींशी निगडित असलेल्या तीन महत्त्वाच्या विषयांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पत्र लिहिले असून, ही कामे निश्चित कालमर्यादेत वेगाने पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, इनाम जमिनी नियमित करून घेण्याबद्दल राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी नियमाकूल करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुढील कार्यवाही सुरु करावी, तसेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नांदेड शहरातील ‘सिडको’च्या घरांच्या हस्तांतरणांच्या अनुषंगाने ही घरे संबंधित नागरिकांच्या नावे करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरु करून त्याबाबत राज्य शासनाला पुढील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा.

त्याचप्रमाणे तिन्ही विषय तातडीने आणि सुसूत्रतेने मार्गी लागावेत यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची सूचना खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचा महसूल अधिकारी, मनपा उपायुक्त (मनपा हद्दीसाठी) आणि सिडकोच्या कामासाठी वरिष्ठ सिडको अधिकारी यांचा समावेश असावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या पुढाकारामुळे नांदेडमधील हजारो नागरिकांच्या घरांचा आणि हक्काच्या जमिनींचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!