क्राइम

नांदेड रेल्वे विभागाची धडक मोहीम; 35 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई, दंड वसुली

नांदेड | रेल्वे स्थानके व गाड्यांमधील अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी (दक्षिण मध्य रेल्वे ) South Central Railway च्या नांदेड विभागाने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे.

दि. 22 ते 28 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 35 अनधिकृत विक्रेते/फेरीवाले आढळून आले असून त्यांच्यावर रेल्वे नियमांनुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत EFT द्वारे ₹13,860 इतका दंडही वसूल करण्यात आला.

वाणिज्य निरीक्षक व तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी वाशीम–अकोला, परभणी–परतूर, परभणी–परळी, जालना–छत्रपती संभाजीनगर, नांदेड–आदिलाबाद, नांदेड–वाशीम तसेच छत्रपती संभाजीनगर–मनमाड या मार्गांवर सघन तपासणी केली.

Oplus_16908288

या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व नियमानुसार सेवा उपलब्ध करून देणे हा असून, अनधिकृत व अस्वच्छ खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे हेही मुख्य ध्येय असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, प्रवाशांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत व रेल्वे परिसरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!