गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन
दानशूरांच्या सहकार्याने रयत सेवाभावी प्रतिष्ठान पुढे सरसावले
हिमायतनगर/हदगांव| तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रयत सेवाभावी प्रतिष्ठान, जवळगाव तर्फे मौजे महाताळा (निवघा बाजारजवळ, ता. हदगाव, जि. नांदेड) येथील एका गरजू कुटुंबासाठी मदतीचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.


चि. सौ. का. वैष्णवी गजानन रुमाले हिच्या विवाहासाठी तिच्या आईने प्रतिष्ठानकडे कळकळीची विनंती केली आहे. दिनांक 24 मार्च 2026 रोजी संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवार (जवळगावकर), अरुण पाटील चक्रीकर व संतोष पाटील सूर्यवंशी यांनी महाताळा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.


पाहणीदरम्यान समोर आलेली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. वधूच्या वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्या वेळी वैष्णवी अवघी 6 वर्षांची, तिची बहीण 4 वर्षांची आणि भाऊ केवळ 2 महिन्यांचा होता. या घटनेनंतर तीन लहान लेकरांची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली.

घरची परिस्थिती इतकी बिकट की स्वतःची एक गुंठा जमीनही नाही, राहण्यासाठी पक्के घर नाही. तरीही आईने दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करत मुलांना शिक्षण दिले आणि संसाराचा गाडा कसाबसा पुढे चालवला.

आता वैष्णवीचा विवाह 26 एप्रिल 2026 रोजी ठरला आहे. मात्र, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत लग्नाचा खर्च उचलणे आईसाठी मोठे आव्हान ठरत आहे. आपल्या मुलीचे लग्न कसे करावे, या चिंतेने आई व्यथित झाली असून मदतीसाठी तिने प्रतिष्ठानकडे धाव घेतली आहे.
प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनाही भावनिक धक्का बसला. वधूची आई आपल्या आयुष्यातील संघर्ष सांगताना अश्रू अनावर झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
रयत सेवाभावी प्रतिष्ठानने समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे की, जसे आतापर्यंत अनेक गरजू मुलींना ‘कन्यादान’ स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली, तसेच या वधूलाही सढळ हाताने मदत करून तिच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आणावा.
कन्यादानासाठी समाजाचा हातभार; अजून १० हजारांची गरज
रयत प्रतिष्ठान, जवळगाव (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) यांच्या माध्यमातून महाताळा (निवघा बाजारजवळ, ता. हदगाव) येथील गरजू वधू चि. सौ. का. वैष्णवी गजानन रुमाले हिच्यासाठी कन्यादान स्वरूपात मदत गोळा केली जात आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी आतापर्यंत सढळ हाताने मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्राप्त झालेल्या मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे —
📅 २५ मार्च २०२६ : ₹३,९१९
📅 २६ मार्च २०२६ : ₹१,१००
📅 २७ मार्च २०२६ : ₹१,८००
📅 २८ मार्च २०२६ : ₹९००
📅 २९ मार्च २०२६ : ₹२,०००
📅 ३० मार्च २०२६ : ₹२,७००
अशा प्रकारे एकूण मदत जमा होत असून, दात्यांचे प्रतिष्ठानतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र, वधूच्या विवाहासाठी अजूनही सुमारे ₹१०,००० (दहा हजार रुपये) इतक्या मदतीची आवश्यकता आहे. रयत प्रतिष्ठानतर्फे सर्व दानशूर नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की, या गरजू कुटुंबाला मदतीचा हात देत कन्यादानाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे.
मदतीसाठी संपर्क :
📞 ९४२०९२९५९७ (फोनपे)
सटवाजी गणपतराव पवार (संस्थापक अध्यक्ष)
🙏 आपला छोटासा हातभार एका मुलीच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण करू शकतो.



