क्राइम

देगलूर नाका स्फोट प्रकरणाचा उलगडा करा; काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

नांदेड | ईदच्या दिवशी नांदेड शहरातील देगलूर नाका येथील ईदगाह परिसरात मोटर सायकलचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेमागे कोणताही घातपाताचा हेतू आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

घटनेला दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी खासदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या निवेदनात, घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करून सत्य तात्काळ जनतेसमोर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या घटनेबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!