क्राइम

नायगाव येथे अवैध शस्त्र प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, गावठी पिस्टल जप्त

नांदेड | नायगाव परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे.

ही कारवाई दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नायगाव जवळील कंडाळा फाटा परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचून १) प्रल्हाद उर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी तम्मा, ता. नायगाव) २) रवि धोंडिबा देवकांबळे (वय २१, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत उपनिरीक्षक साईनाथ पुवड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाचा सहभाग होता. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक केले असून, जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!