महाराष्ट्र

नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन

नांदेड| नांदेड शहरात इतिहासप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारे शिवकालीन सुवर्ण होन (सोन्याचे नाणे), प्राचीन नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. नांदेड किल्ल्याचे किल्लेदार व नांदेड किल्ला संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

हे प्रदर्शन शुक्रवार, दि. ३ एप्रिल ते रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नवा मोंढा, नांदेड येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेले दुर्मिळ सुवर्ण होन (सोन्याची नाणी) तसेच चक्रधर संग्रहालय, चिखली (बुलडाणा) येथील सुमारे ६०० प्राचीन नाण्यांचा अनमोल संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच महावली शहाजी राजे भोसले ऐतिहासिक वस्तू जतनवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचेही विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

इतिहास संशोधक अशोक सिंह ठाकूर यांनी संकलित केलेल्या शिवकालीन नाण्यांमुळे या प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आर्थिक, सांस्कृतिक व लष्करी परंपरेची झलक या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

आयोजकांच्या वतीने नागरिक, विद्यार्थी व इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दुर्मिळ ऐतिहासिक ठेव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!