आरोग्यराजकारण

भूमिपुत्र डॉ. शिवाजीराव पोले यांचे समाजोपयोगी कार्य आदर्श — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

हरिनाम सप्ताहानिमित्त बरडशेवाळा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील बरडशेवाळा येथे हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ व ‘पोले इंडोव्हॅस्क्युलर केअर, संभाजीनगर’चे संचालक डॉ. शिवाजीराव पोले यांनी आपल्या जन्मभूमीत हे शिबिर आयोजित केले.

हभप मधुकर खोडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त हभप रामेश्वर खोडे महाराज (ईसापुरकर) यांच्या वाणीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान रविवारी (दि. 29 मार्च) या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश मस्के, दंतरोग तज्ज्ञ डॉ. वैष्णवी मस्के यांच्यासह नांदेड येथील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यामध्ये डॉ. बालाजी नाईक (मधुमेह, थायरॉईड व हार्मोन तज्ज्ञ), डॉ. सूरज जाधव (न्यूरो सर्जन), डॉ. विठ्ठल फड (जनरल फिजिशियन), डॉ. उमेश कानडे (स्पाईन सर्जन), डॉ. अश्विनी कोडगे (त्वचारोग तज्ज्ञ), डॉ. भरत रायघोळ तसेच डॉ. एस. बी. भिसे, डॉ. बी. के. निळे, सतीश मठपती व शेख मुबीन यांचा समावेश होता.

शिबिरात बरडशेवाळा व परिसरातील अनेक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास आमदार बाबुराव कदम कोहळीकर उपस्थित होते. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचे आभार मानत डॉ. शिवाजीराव पोले यांचे आपल्या जन्मभूमीत सातत्याने सुरू असलेले समाजोपयोगी कार्य इतरांसाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच स्थानिक विकास निधीतून गावाच्या विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे, आमदार कोहळीकर यांचे समर्थक, गावकरी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य मित्र दिनेश दहिभाते, प्रभाकर दहिभाते व नागोराव पोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!