Friday, April 10, 2026
Google search engine
Homeराजकारण70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड |  नांदेड शहरात अवघ्या 70 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी शहर अक्षरशः हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी Rahul Kardile यांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
शहरात अल्पावधीत घडलेल्या या हत्याकांडांमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षितता वाढली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच वाढत बळ असा गंभीर चित्र समोर आले आहे.

याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठोस मागण्या निवेदनाद्वारे केल्या असून, यात  अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी, गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई, नशाखोरीच्या अड्ड्यांचा बंदोबस्त, शहरात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे अश्या मागण्या करण्यात आल्या.

या निवेदनावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यात यशपाल भिंगे , राजेश पावडे , बालाजी चव्हाण , आनंद चव्हाण , अब्दुल सत्तार यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!