Friday, April 10, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्रहिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

मुळ लेआऊट मधील रस्त्यांसह खुल्या जागांची प्लाॅट म्हणून विक्री - दत्ताभाऊ शिराणे

हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जमिनीचे प्लाॅट पाडून विक्री करणाऱ्या मालकांनी मुळ लेआऊट मध्ये दाखविलेले रस्ते ओपन स्पेस ही प्लाॅट पाडून त्याची विक्री केली आहे. परिणामी अनेक ओपन स्पेस आता गायब झाले आहेत. या बाबतीत संबंधित प्रशासनाची उदासीनता अश्या प्रकारच्या गैर प्रकारांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. रस्ते ओपन स्पेस दाखवून नगररचना कार्यालयाकडून लेआऊट मंजूर करून घ्यायचे आणी नंतर परस्पर फेरबदल करून रस्ते आणी ओपन स्पेस ची परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली.

हिमायतनगर शहराची हद्दवाढ होवून आजूबाजूचा खुप मोठा भाग हा नगरपंचायतीच्या हद्दीत आलेला आहे. व तसेच शहराचे विस्तारीकरण ही वेगाने सुरू आहे. नवीन वसाहतीत अनेकांनी जमीनी विकत घेऊन त्याचे प्लाॅट पाडून ते विक्री करण्याचा व्यवसाय अनेकांनी सुरू केला आहे. या करीता संबंधित जमीनीला अकृषक करून त्याचे लेआऊट तयार करण्यात आले.

नगररचना विभागांकडून जागेच्या क्षेत्रफळानुसार रस्ते, ओपन स्पेस आदी बाबी सर्व तपासून ते दाखविले असेल तरच त्यास मंजूरी दिली जाते. रस्ते आणी ओपन स्पेस मध्ये जागा जास्त जात असल्याने जमिनीचे प्लाॅट पाडून विक्री करणाऱ्यांनी मात्र वेगळी शक्कल लढवीत मुळ लेआऊट बाजूला ठेवले आहेत. तर अनेकांनी बनावट नकाशा तयार करून या रस्त्याचे व ओपन स्पेस चे प्लाॅट पाडले व त्याची विक्री ही केली. आता या विक्री झालेल्या जागेवर अनेकांनी पक्की घरे ही बांधकाम केली आहेत.

विक्री झालेले रस्ते व ओपन स्पेस मोकळे करून नव्याने ते ताब्यात घेण्याचे मोठे अवाहन आता नगरपंचायत प्रशासना समोर उभे ठाकले असून, मोकळ्या जागेवर अतिक्रमणे ही मोठ्याप्रमाणात झाली आहेत. शहरात ओपन स्पेस जे शिल्लक आहेत. त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे होत आहेत.

घरे बांधताना किंवा कंपाऊंड घेतांना या जागेचाही अवैध वापर जात असून अश्या ठिकाणीसुद्धा नगरपंचायत प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून ही व अश्या प्रकारची अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. तसेच ओपन स्पेस हस्तांतरणाची प्रक्रिया झाली नसल्याने प्लाॅट पाडणाऱ्यांनी सोडलेल्या ओपन स्पेस आणी रस्त्याचे हस्तांतरण स्थानिक स्वराज्य संस्थाना करणे गरजेचे आहे. तसे झाले नसेल तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थानी या ओपन स्पेसच्या हस्तांतरणासाठी आवश्यक ती कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. मात्र हिमायतनगरात अनेक ओपन स्पेस नगरपंचायतीकडे हस्तांतरीत झालेच नाहीत.

नगरपंचायतीकडून या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. आता नव्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका नवीन बाॅडी नगरपंचायतीवर विराजमान झाली आहे. आता नवीन बाॅडी अश्या प्रकारची गंभीर प्रकरणे कश्या प्रकारे हाताळून कायद्याचा गैरवापर करणार्‍यांना कश्या प्रकारे चाप लावतील? या कडे मात्र जनतेचे लक्ष लागून आहे.

नाल्याची रुंदी कमी करून अतिक्रमण
शहरातील किनवट नांदेड नॅशनल हायवेवरून वाहणारा नाला हाही आता अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. या नाल्याला वरच्या भागांतून पाण्याचा प्रवाह फार जास्त आहे. जेव्हा पहिल्या डांबरी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या पुलावरून पावसाच्या पुराचे पाणी जायायचे. तेव्हा अनेक वेळा या पुलावर जवळपास तिन फूट वर पुराचे पाणी वाहत असल्याने या महामार्गावर ट्रॅफिक जॅम होत होत्या. दोन्ही कडच्या बाजूंनी लांबच लांब वाहणाच्या रांगा लागत होत्या.

आता नव्याने या रस्त्याचे सिमेट्रीकरण झाले आणी इथे मोठा पुल उभारण्यात आला. परंतू या भागातील नागरिक व प्लाॅट धारकांनी चक्क नाल्याला लक्ष्य केले असून अर्धवट अवस्थेत नाला बुजवून त्यावर अतिक्रमण केले आहे. तसे पाहीले तर वरच्या भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विचार करून, या नाल्याची रूंदी वाढविणे गरजेचे असताना, तसे न करता  त्याच नाल्याला जेशिबीच्या साह्याने बुजवून टाकण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ लक्ष वेधून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली असून, जिल्हाधिकारी यांच्याकडे उपरोक्त प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात आलेले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!