Friday, April 10, 2026
Google search engine
Homeराजकारणहिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे...

हिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे यांच्याकडून पाहणी

शाखा अभियंता श्री देशपांडे यांच्याकडून कामाचा आढावा

हिमायतनगर (अनिल  मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूने सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीची अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी या कामात अंदाजपत्रकाला बगल देत दर्जाहीन काम होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार आज (दि. ९ एप्रिल) सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्री देशपांडे यांनी हिमायतनगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी तक्रारदार वामनराव पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून नालीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, वामनराव पाटील यांनी यापूर्वी झालेल्या निकृष्ट कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते पूर्णपणे फोडून नव्याने नाली बांधण्याची मागणी केली. तसेच, दर्जेदार साहित्य वापरले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही दिला.

या पाहणीमुळे हिमायतनगरमधील नाली बांधकामाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला असून, पुढील काम खरोखरच दर्जेदार होणार का..? आणि आधीचे निकृष्ट काम पुन्हा करण्यात येणार का…? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी नगराध्यक्ष शेख रफिक शेठ, कानिष्ठ अभियंता सोनटक्के, ठेकेदाराचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!