Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमहिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

हिमायतनगरच्या उमर चौकात रक्तरंजित हाणामारी

तलवार-चाकूने हल्ले, एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी

हिमायतनगर| शहरातील उमर चौक परिसरात बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी दोन गटांमध्ये झालेल्या भीषण भांडणाने परिसरात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रीय महामार्गालगत घडलेल्या या घटनेत तलवार व चाकूचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.

या रक्तरंजित हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर दोन्ही बाजूकडील व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल होऊन एकमेकांविरुद्ध तक्रारी देत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचेच हे गंभीर रूप असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

तर आमच्या माणसाला पैसे का..? मागतोस असे कारण समोर करून हि घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी व्यक्तीवरही हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलीस घटनास्थळाचा तपास करत असून, गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!