Friday, April 10, 2026
Google search engine
Homeकरियरहिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर...

हिमायतनगरचा ऋतुराज सुवर्णकार MPSC मध्ये यशस्वी; पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी सुनील वेदप्रकाश सुवर्णकार यांचे चिरंजीव ऋतुराज सुनील सुवर्णकार यांनी लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करत संभाजीनगर पोलिस आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर नियुक्ती मिळवली आहे.

मेहनतीचे फळ
साध्या नोकरीत कार्यरत असलेल्या वडिलांनी मुलाला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवले. त्यानंतर ऋतुराज यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करून खासगी नोकरी न करता MPSC ची तयारी करत शासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला.

कुटुंबाचा मोठा वाटा
ऋतुराज यांच्या यशामागे आजोबा वेदप्रकाश सुवर्णकार व आजी कमल सुवर्णकार यांचे मोठे योगदान असून, त्यांनी त्यांच्यासोबत राहून शिक्षणात मोलाची साथ दिली.

खेळाडू कोट्यातून निवड
शाफ्ट टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळावील असून, त्याची कामगिरीच्या जोरावर खेळाडू प्रवर्गातून निवड झाली आहे. नोकरीसोबतच ऋतुराज यांनी लॉन टेनिस अकॅडमी सुरू करून इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही सुरू केले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सूर्यकांता ताई पाटील, सचिव अरुण कुलकर्णी, तसेच स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

याशिवाय आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी दूरध्वनीवरून पालकांचे अभिनंदन केले. आपल्या मेहनतीने कुटुंब व हिमायतनगरचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ऋतुराज सुवर्णकार यांची ही यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!