Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeकरियरहिमायतनगरचा अभिमान! डॉ. ओंकार देवसरकर ‘MBBS’ पदवीधर; ग्रामीण युवकांसाठी प्रेरणेचा दीप

हिमायतनगरचा अभिमान! डॉ. ओंकार देवसरकर ‘MBBS’ पदवीधर; ग्रामीण युवकांसाठी प्रेरणेचा दीप

हिमायतनगर/सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) जिद्द, कष्ट आणि स्वप्नांच्या जोरावर ग्रामीण भागातूनही मोठी भरारी घेता येते, याचा प्रत्यय हिमायतनगरच्या डॉ. ओंकार देवसरकर यांनी पुन्हा एकदा दिला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी ‘MBBS’ पदवी मिळवत आपल्या गावाचा मान उंचावला.

या ऐतिहासिक सोहळ्याला वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने डॉ. ओंकार यांचा सन्मान होताच हिमायतनगरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा अभिमान द्विगुणित झाला.

आमदारांकडून गौरव
हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी डॉ. ओंकार यांच्या यशाचे कौतुक करत, “ग्रामीण युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश इतरांसाठी दिशादर्शक आहे. ते पुढे उत्कृष्ट डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करतील,” असा विश्वास व्यक्त केला.

घरात ‘डॉक्टर’चा डबल आनंद
डॉ. ओंकार यांच्या यशात आणखी एक खास बाब म्हणजे त्यांच्या भगिनी डॉ. भक्ती देवसरकर देखील डॉक्टर आहेत. एकाच कुटुंबात दोन डॉक्टर घडल्याने देवसरकर कुटुंबात आनंदाचा जल्लोष आहे. गावकऱ्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

संघर्षातून यशाकडे
मर्यादित साधनसामग्रीतून शिक्षण घेत, कठोर परिश्रमांच्या जोरावर वैद्यकीय पदवी मिळवणारे डॉ. ओंकार हे ग्रामीण युवकांसाठी जिवंत प्रेरणा ठरत आहेत. त्यांच्या यशामुळे हिमायतनगरच्या नावाला नवी ओळख मिळाली असून, भविष्यात ते आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!