Friday, April 10, 2026
Google search engine
Homeक्राइमश्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा 6 तासांत छडा

ख्य आरोपीवर पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार, चौघे ताब्यात

नांदेड | नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या सहा तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. यावेळी मुख्य आरोपीवर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार करत त्याला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली.

दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 5.20 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीनगर मुख्य रस्त्यावर सोनू कल्याणकर यांचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तात्काळ चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.

मुख्य आरोपीवर गोळीबार
मुख्य आरोपी अंकुश गजानन गंदनवाड (वय 20) हा झरी खदान परिसरात पळून जात असताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी पाठलाग केल्यावर त्याने गावठी पिस्तुलातून फायर करण्याचा प्रयत्न केला. या वेळी स्वसंरक्षणार्थ पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी सर्विस पिस्तुलातून गोळीबार केला. ही गोळी आरोपीच्या उजव्या पायाला लागल्याने तो जखमी झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर तत्काळ विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

अंकुश गजानन गंदनवाड (20), प्रसाद ऊर्फ पियुष ऊर्फ ऋषी शिवाजी शिंदे (22), मधुसुदन ऊर्फ कृष्णा जोगदंड (19), रोहित राजेश लोट (21) याना अटक करून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, अंदाजे किंमत : ₹31,000 असा मुद्देमाल जप्त केला.  त्यांच्यावर कलम 103(1), 61(2) भारतीय न्याय संहिता शस्त्र अधिनियम कलम 4/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात जलद आणि धाडसी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले.  नांदेड पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!