सामाजिक

मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने ता. १ एप्रिल रोज बुधवारी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्याचे दुःख अनावर झाल्याने थकलेला बाप काशीम लालासाब निछलकर वय ७० वर्ष हे मुलाच्या मृत्यूच्या विरहात अवघ्या चार तासांतच म्हणजेच ठीक ६ वाजता गतप्राण झाले असल्याने फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे.

फुलवळ येथील हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असताना देखील मोठ्या धैर्याने ते संकटाशी सामना करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण हे रात्रंदिवस काबाड कष्ट करीत करत होते.

ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बरेच दिवस झाले उपचार चालूच होता. असे असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता परिस्थितीला सामोरे गेले पण आज अचानक वडील व मुलाचा मृत्यू झाल्यामुळे निछलकर कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले.

या कुटुंबियांना राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेत त्यांना मदत करावी अशा प्रकारची प्रतिक्रिया फुलवळ येथील नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुल, एक सून, दोन बहिणी असा परिवार आहे.

मुलाच्या मृत्यूचे दुःख अनावर झाले असल्याने वयाने थकलेला बाप काशीम निछलकर यांनी मुलाचा मृत्यू होऊन अवघे चार तास होतात न होताच तेवढ्यात मुलाचा विरह सहन न झालेल्या बापानेही जीव गमावला असल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा त्या बाप-लेकावर हजारोच्या उपस्थित एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!