Friday, April 10, 2026
Google search engine
Homeआरोग्यभोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

भोकर ग्रामीण रुग्णालयात एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात

१४–१५ वयोगटातील मुलींसाठी विशेष उपक्रम; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

भोकर (प्रतिनिधी) गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या मोहिमेत १४ ते १५ वयोगटातील मुलींना लस देण्यावर भर दिला जात आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या नियोजनानुसार ६ एप्रिल रोजी दोन मुलींना एचपीव्ही लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत पालकांना एचपीव्ही लसीबाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून सोशल मीडियावर पसरलेल्या गैरसमजांबाबत जागृती केली जात आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींना लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, भोकर शहरातील पालकांनी १४ ते १५ वयोगटातील मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणावे आणि येताना आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी डॉ. ज्योती यन्नावार, डॉ. अपर्णा जोशी, डॉ. अविनाश गुंडाळे, इन्चार्ज सिस्टर उज्वला पवार, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड तसेच आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, योगेश पवार, संजय धुमाळे, मारोती गेंदेवाड आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून भविष्यात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!