Sunday, April 5, 2026
Google search engine
Homeक्राइमपरभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

परभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

परभणी (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर आज (५ एप्रिल) सकाळी तोडफोड व मारहाणीची धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वरील लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करण्यात आली, तसेच देखभाल कर्मचाऱ्यावर हल्लाही करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने लिफ्टमध्ये घुसून दरवाज्याचा लॉक तोडत सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब ड्युटीवर असलेल्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने आक्रमक होत कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली.

परिस्थिती हाताळताना संबंधित कर्मचाऱ्याने आरोपीचा फोटो काढण्यात यश मिळवले आणि तत्काळ इतर कर्मचारी तसेच रेल्वे संरक्षण दल यांना माहिती दिली. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

घटनास्थळी तपासणीदरम्यान लिफ्टचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेरा नुकसान झालेल्या अवस्थेत आढळून आला. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. संबंधित व्यक्तीविरोधात रेल्वे मालमत्तेची तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त लिफ्ट व सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्थानकावरील प्रवासी सुविधांचा जबाबदारीने वापर करावा व कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासन किंवा RPF ला कळवावे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!