Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमनांदेड : वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा धडाका

नांदेड : वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा धडाका

287 प्रकरणांवर कारवाई, ₹2.81 लाखांचा दंड वसूल

नांदेड| शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने मोठी मोहीम राबवत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहनचालक आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. या कारवाईत एकूण 287 प्रकरणे नोंदवून 2 लाख 81 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह रेल्वे स्टेशन रोड, वजिराबाद चौक, कलामंदिर वर्कशॉप, राज कॉर्नर आणि छत्रपती चौक या ठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली.

या दरम्यान: अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, विना परवाना / परमिट वाहनचालक, ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वेगाने वाहन चालवणे, ‘फटाका बुलेट’ (आवाज करणाऱ्या बाईक्स) यांच्यावर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात आली. तसेच ऑटोचालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहने योग्य पार्किंगमध्येच उभी करावीत, वाहतुकीस अडथळा होईल असे अतिक्रमण करू नये, सिग्नलचे नियम पाळावेत, अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजिराबादच्या पथकाने केली.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!