स्थानिक

सारजाबाई ठाकुर यांचे निधन; सरसम बु. गावावर शोककळा

हिमायतनगर | तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री वामनराव मोरे ठाकुर महाराज यांच्या मातोश्री सारजाबाई रामचंद्र मोरे ठाकुर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे, सुना व नातसुना असा मोठा परिवार आहे.

सारजाबाई या शांत, सोज्वळ व आपुलकीने वागणाऱ्या जुन्या पिढीतील आदर्श गृहिणी होत्या. साधी राहणी, नीटनेटकेपणा, डोक्यावर पदर आणि आदरयुक्त बोलणे ही त्यांची ओळख होती. कुणालाही दुखावू नये, हीच त्यांची जीवनशैली होती.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सरसम (बु.) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
..भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏ॐ शांती 🌺

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!