Friday, April 10, 2026
Google search engine
Homeक्राइमनांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

नांदेड पोलिसांची कडक कारवाई; आक्षेपार्ह व भितीदायक सोशल मीडिया पोस्टवर गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही तरुणांकडून धारदार शस्त्रांचे प्रदर्शन, गुंडगिरीचे व्हिडिओ व भितीदायक पोस्ट प्रसारित केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाने कडक पावले उचलली आहेत. अशा आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, काही युवक सोशल मीडियावर तलवार, चाकू, कोयते, अग्नीशस्त्रे यांचे प्रदर्शन करत फोटो-व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच चित्रपटातील गुंडगिरीचे गाणे वापरून रील्स तयार करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही प्रकरणांमध्ये मृत गुन्हेगारांचे गौरव करणारे व्हिडिओही प्रसारित होत असल्याचे आढळून आले आहे.

Oplus_16908288

या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली 2025 मध्ये Social Media Monitoring Cell स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत आत्तापर्यंत शेकडो आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचा आढावा : एकूण आक्षेपार्ह पोस्ट : 430+ दाखल गुन्हे : 136, अल्पवयीनांना समज : 25, प्रतिबंधक कारवाई (HNSS कलम 128) : 08, इतर प्रतिबंधक कारवाई : 13, प्रस्तावित कारवाई : 410 पोस्ट

Oplus_16908288

पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या भितीदायक किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युवकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व सकारात्मक पद्धतीने करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तक्रार नोंदवा : संशयास्पद किंवा आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास Social Media Monitoring Cell (मो. 77740 89100) किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यासाठी Instagram व Facebook यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असून, संबंधितांनी स्वतःहून पोस्ट हटवाव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!