नांदेडमध्ये स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई; अवैध खंजरासह दोघांना अटक

40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त; भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदेड| शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध खंजर बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 191/2026, कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरविंदर सिंग गंगाचरसिंग येवते (रा. गाडीपूरा, इतवारा) आणि हरप्रीतसिंग केशरसिंग लांगरी (रा. शहीदपुरा, नांदेड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कॉम्बिंग ऑपरेशन व गस्त सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम अवैध हत्यार घेऊन फिरत आहेत. त्यानुसार स्ट्रिट सेफ्टी पथकाने भाग्यनगर रोडवरील पागल टी हाऊससमोर सापळा रचला. संशयितांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून एक लोखंडी खंजर (किंमत 500 रुपये) आणि पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत 40,000 रुपये) असा एकूण 40,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रिट सेफ्टी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले असून, शहरात अवैध कृत्यांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top