Tuesday, April 7, 2026
Google search engine
Homeक्राइमनांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

नांदेडमध्ये वाहतूक नियमभंगावर ‘धडक’ कारवाई; २४१ केसेस, अडीच लाखांचा दंड

नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि नियमभंगावर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना धावणारी वाहने, फटाका बुलेट, ट्रिपल सीट, मोबाईल वापरत वाहन चालविणारे तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फळगाड्यांवर कारवाई करत एकूण २४१ केसेस नोंदवण्यात आल्या.

ही कारवाई अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गुरव आणि शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह ही मोहीम राबवली.

रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर वर्कशॉप, राजकॉर्नर आणि छत्रपती चौक या प्रमुख भागात वाहनांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. तसेच ऑटो- चालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल २,५४,५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर अतिक्रमण करणारे हातगाडे व वाहने हटवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, सिग्नलचे पालन करावे आणि रस्त्यावर अतिक्रमण टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरत असून नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!