Tuesday, April 7, 2026
Google search engine
Homeक्राइमचंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदन तस्करांवर मोठी कारवाई; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| अवैध चंदन तस्करीविरोधात नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा पोलीस ठाणे हद्दीत पहाटे करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लातूरहून मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होणार होती. त्यानुसार, लोहा-नांदेड मार्गावरील सई हॉटेलजवळ संशयित वाहन अडवण्यात आले. सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे दिसून आले, मात्र तपासात ड्रायव्हरच्या मागील बाजूस बनवलेल्या गुप्त कप्प्यात चंदन लपवून ठेवले असल्याचे उघड झाले.

या कप्प्यातून 1,470 किलो वजनाचे सुमारे 36.75 लाख रुपये किंमतीचे चंदन जप्त करण्यात आले. तसेच आयशर वाहन आणि 11 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 51.96 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी तुकाराम बुंदराळे, तौफिक देशमुख, रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपाडे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच वन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांचाळ करत आहेत.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधात माहिती देण्यासाठी पोलिसांनी ‘खबर’ हेल्पलाइन (91 50 100 100) सुरू केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!