सामाजिक

‘केरला स्टोरी पार्ट-2’ मोफत शोला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद

धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून मुलींसाठी जागृतीचा उपक्रम ठरला चर्चेत

नांदेड| हिंदू मुलींमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित ‘केरला स्टोरी पार्ट-2’ या चित्रपटाच्या मोफत पाच शो उपक्रमाला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच मुलींची मोठी गर्दी उसळली असून, सर्व शो हाऊसफुल्ल झाल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सोमवार, दि. ३० मार्च रोजी पीव्हीआर सिनेमा येथे भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान विविध स्क्रीनवर पाच शो आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या शोचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्यबापू देशमुख यांनी या उपक्रमाची दखल घेत ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्म पुरस्कारासाठी राज्यपालांमार्फत शिफारस करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमात मुलींचे पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले, तर बुलंद घोषणाबाजी आणि पुष्पवृष्टीमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले होते. आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळीने कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक रंगत आणली. विशेष म्हणजे ‘लव्ह जिहाद’ विरोधात सजग राहण्याची घेतलेली शपथ हा कार्यक्रमातील सर्वाधिक प्रभावी क्षण ठरला. चित्रपट पाहताना अनेक मुली व महिलांना भावनिक अनावर होत अश्रू अनावर झाले.

विविध शोचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघ, ॲड. चैतन्यबापू देशमुख, मानिनी नांदेडकर, सुयोग कवटगी, शंकर वानेगावकर आणि अनिल चिद्रावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका अमृता बजरंगसिंह ठाकूर, संगिता चारुदत्त चौधरी, मिली मोदी, स्नेहलता जायस्वाल, अनिलसिंह हजारी, राजेश केंद्रे, चंचलसिंह जट, वसुबेन पटेल आणि लक्ष्मी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोफत तिकीट उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या आशिष काबरा, श्रीराम मेडेवार, राज मड्डी, संजय केंद्रे, दिलीप मोदी, सतीश शर्मा, प्रशांत दामरगीद्दे, चारुदत्त चौधरी, प्रा. संजय पाटील, आकाश येमेकर, इंजि. जयचंद्र तत्तापुरे, प्राचार्य दीपक बच्चेवार, डॉ. प्रणद जोशी, सुरेश पळशीकर, पप्पू रिझवानी यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात संध्या छापरवाल व सविता काबरा यांनी मुलींचे औक्षण केले, तर शिवा लोट, सुरेश शर्मा व शिवचरण लोट यांनी पुष्पवृष्टी केली. उषा गवारे व पल्लवी नगारे यांनी साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले. प्रकाश उंटवाले व अमित शिवपुजे यांनी स्मृतीचिन्ह देऊन सौ. जयश्री ठाकूर व ॲड. दिलीप ठाकूर यांचा सन्मान केला. धीरज स्वामी यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेशसिंह ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरदार जयदेवसिंघ, अरुण काबरा, जगतसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, गणेशसिंह परमार, सुरेश निलावार, हितेश टांक, आकाश अग्रवाल, गिरीश पटवारी, संतोष भारती, शुभम साकळे, देवदत्त देशपांडे, गणेश कानगुले, बालाजी वाघमारे, संजय कोकुलवार, अशोक गिते, मनिषा तांबोळी, बाळू जोशी, वासुदेव बक्षी, गणेश देशमुख, जयंत देशपांडे, किरण देशपांडे, विश्वनाथ स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

चित्रपटानंतर अनेक मुलींनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत हा उपक्रम सामाजिक जागरूकतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे सामाजिक भान, सांस्कृतिक मूल्ये आणि जागरूकतेचा प्रभावी संदेश पोहोचल्याने संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!