क्राइम

कुंडलवाडी पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-पान मसाला जप्त

1.08 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड/बिलोली | कुंडलवाडी पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत 1 लाख 8 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कुंडलवाडी शहरातील नवा गल्ली परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या घरातून विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्याचा साठा आढळून आला.

या कारवाईत M Scented Tobacco Gold, SR सुगंधित पान मसाला, Royal Zafrani Zarda, Bombay Royal पान मसाला अशा विविध ब्रँडचा साठा तसेच MH 26 S 5207 क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण 1,08,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 39/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 123, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यात गुटखा व तत्सम अवैध पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!