सामाजिक

एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

नांदेड| येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजच्या भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी पाणी” (Water for Social Cause) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे तांत्रिक व रचनात्मक नियोजन भूशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते प्रा. आकाश करंडे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. गायकवाड व प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी उपक्रमाला मार्गदर्शन व नेतृत्व दिले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य कॉ. प्रदीप नागापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे, डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. मराठे, प्रा. डॉ. जाधव, प्रा. करंडे व प्रा. चोंडे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेत सादिया नुसरत हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सतीश मोखेडे व पूर्वा सुरोशे यांनी विभागून मिळवला, तर तृतीय क्रमांक वैभव वाघमारे व सईदा अतयाब यांनी मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्पर्धेत यश मिळवणे हा अंतिम उद्देश नसून, विद्यार्थ्यांनी समाजासाठी ‘जलदूत’ बनून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर डिजिटल ई-प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रा. आकाश करंडे व डॉ. किशोर गायकवाड यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीचा प्रभावी संदेश पोहोचला.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!