राजकारण

आ. बाबुराव कदम यांच्या पाठपुराव्याला यश; पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर

हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी दिलासादायक निर्णय

नांदेड, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, पैनगंगा प्रकल्पातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे.

या निर्णयामागे आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेत देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची म्हणी लावून धरली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!