क्राइम

नांदेडमध्ये तलवार-खंजरासह दहशत माजवणाऱ्या टोळीवर कारवाई

52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| शहरात तलवार व खंजरासारखी धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर विमानतळ पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत 52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 29 मार्च रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरातील एका ठिकाणी संशयित व्यक्ती शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. यात तीन आरोपींचा समावेश आहे.

आरोपींकडून दोन तलवारी, एक खंजर आणि एक मोटारसायकल (MH 26 CR 0803) असा एकूण 52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे सर्वजण शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 113/2026 अंतर्गत कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!