Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeसामाजिकहिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

हिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

मुख्य चौकांवर जीवघेणा वेग; फेरोज खान पठाण यांची तात्काळ उपाययोजनांची मागणी

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी ठाम मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी ALMbharat च्या माध्यमातून केली आहे.

हिमायतनगर शहरातीळ विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणारा कॉर्नर, श्री परमेश्वर मंदिर कमान रस्ता, शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसर, उमर चौक कमान तसेच बोरगडी रस्ता या शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.

यासंदर्भात संबंधित विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पठाण यांनी केला. “वेळेत उपाययोजना न केल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळायची असेल तर तातडीने स्पीड ब्रेकर बसवणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. याकडे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी देखील लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडूनही त्वरित उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!