राजकारण

नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 31 मार्चला आढावा बैठक

नांदेड | नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंगळवार, दि. 31 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता बायपास रोडवरील आनंदसागर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी दिली आहे.

या बैठकीला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन होणार असून, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगांवकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदेमधील निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्य यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच महिला, युवक, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक, ओबीसी, किसान, कामगार, दिव्यांग, शिक्षक, इंजिनीयर, व्यापारी, डॉक्टर आदी विविध घटकांच्या सेल प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!