स्थानिक

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात रामकथा सोहळा

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन नांदेड| नवीन नांदेड येथील सिडको, संभाजी चौक परिसरातील श्री दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये रामकथेचा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

दि. २६ मार्चपासून हभप आनंद महाराज अंतरगावकर यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय रामकथा सायंकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असून १ एप्रिल रोजी या रामकथेची सांगता होणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून रामकथेचा लाभ घेत आहेत.

हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असून वातावरणात भक्तिमय उत्साह पाहायला मिळत आहे.
दि. २ एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन, महाअभिषेक पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होत असून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरातील रामभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!